माझी मातृभाषा मराठी निबंध |My Mother Tongue Marathi Essay

माझी मातृभाषा मराठी निबंध

जर तुम्ही माझी मातृभाषा मराठी निबंध शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आज मी हा निबंध सर्व विद्यार्थ्यांसाठी लिहिला आहे जो आपण शाळेत निबंध लेखन वापरू शकता. इयत्ता 9 वी किंवा 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक छोटासा आणि साधा निबंध आहे, तर चला वाचूया माझी माय मराठी निबंध.

आपल्या मायबोलीचे सामर्थ्य वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

“माझा मराठाचि बोलु कौतुके परि आमृतातेही पैजा जिंके”

ज्ञानेश्वरांचा आत्मविश्वास मराठीच्या बोलांनी सार्थ ठरला आहे. माझ्या मराठीतील साहित्य समृद्ध आहे. मला वाटते की एक आयुष्य काही ह्या साहित्याचा रसास्वाद घेण्यास पुरणार नाही. या ठिकाणी थोडी माणसे आनंद लुटतात.

मायबोली मराठी निबंध

माझी मातृभाषा मराठी निबंध- मराठी भाषा एवढी शक्तिशाली आहे. म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला मराठीची आवश्यकता आहे. प्रत्येक प्रांतात त्या, त्या भाषेला महत्त्व आहे. आता तुम्हीच बघा. पराक्रमाच्या शौर्याच्या कथा सांगताना ती बाणेदार बनते. तसेच मराठी मातेचे प्रेम, माया, व्यक्त करताना ती खूप मृदू बनते.

मराठी भाषेचा इतिहास

जर आपण मराठी भाषेबद्दल बोललो तर ही भारतातील महत्वाच्या भाषांपैकी एक आहे. जवळजवळ 7 कोटी लोक मराठीला प्राथमिक भाषा म्हणून वापरतात.

मराठीला अभिजात दर्जा मिळावा असा महाराष्ट्र राज्य सरकारने असा दावा केला आहे की किमान २३०० वर्षांपूर्वी संस्कृत सोबत बहिणीची भाषा म्हणून मराठी अस्तित्वात होती, म्हणूनच माझी मातृभाषा मराठी आहे.

आज मराठीतून विज्ञानाचे चमत्कार प्रकट होतात. मराठी भाषेला प्राचीन परंपरा आहे. वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून ती बोलली जात आहे. तिची शब्दसंपत्ती विपुल आहे. आज आपण जे संतांचे चरित्र, पवित्र ग्रंथ, एखाद्या पुढाऱ्याची माहिती वाचतो ती या मराठी शब्दसंपत्ती मुळेच! निरनिराळे लेखक, कवी यांनी शब्दसंपत्ती च्या मांडणीने आपले भाषिक विचार लोकांसमोर मांडले.

ते आपण वाचतो, कवितेच्या गाण्याच्या ओळी आपण आवडीने गुणगुणत असतो. जास्तीत जास्त मराठी माणूस महाराष्ट्रात आहे. त्या प्रत्येकाने मराठी बोलणे आवश्यक आहे. काही कचेरीत मराठी भाषेला महत्त्व देऊन पूर्ण कार्यालयाचे व्यवहार मराठीत करतात. उदा.-सचिवालय व इतर कार्यालये.

महाराष्ट्रात विविध भाषा लोक राहतात. त्यांच्या तोंडून मराठी भाषा चुकीची आली तर ते क्षम्य आहे. त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न करावा. परंतु या उलट काही वेळा आपल्याला असे आढळते की, आम्ही इतर भाषेतील शब्द मराठीत सहजपणे वापरत असतो.

या मायबोलीला कायम स्वरुपात ठेवायचे असेल तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना कोणत्याही माध्यमाच्या शाळेत पाठवावे, परंतु मराठीची गोडी त्यांच्यात निर्माण अवश्य करावी व त्यांच्यातील सामाजिक बौद्धिक, सांस्कृतिक विचारांना प्रोत्साहन घावे, मराठी भाषेतील शुद्धता तिची अमृतवाणी व मराठीतून होणारे सर्व व्यवहार याचाच अर्थ “माझी मातृभाषा मराठी आहे” म्हणूनच प्रत्येकाने तिला जपले पाहिजे.

माझी मातृभाषा मराठी निबंधातील 10 Lines (ओळी)

  1. मराठी भाषा ही भारतातील एक प्राचीन भाषा आहे.
  2. मराठी भाषा संस्कृतने प्रेरित आहे.
  3. मराठी भाषा ही महाराष्ट्रातील सामान्य भाषा आहे.
  4. महाराष्ट्रात जवळपास 7 कोटी लोक मराठी भाषा बोलतात.
  5. येथे वाग्री, कोकण, कोळी, मालवणी अशा विविध प्रकारची मराठी भाषा बोलली जाते.
  6. प्राचीन काळात संत तुकाराम, एकनाथ, नामदेव मराठी भाषा बोलत असत.

निष्कर्ष(Conclusion): –

मला आशा आहे की आपणा सर्वांना माझी मातृभाषा मराठी निबंध आवडेल, कृपया तुम्हाला निबंधात काय आवडते त्यावर भाष्य करा आणि तुमचे मित्र, विद्यार्थी व मुलांसह सामायिक करा.

माझी मातृभाषा मराठी निबंध:-

Add Comment